टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात आज व्हीआयपी ऑटोमॅटिक कार वाशिंग सेंटरचा शुभारंभ आई व वडिलांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच सर्व सोयींनीयुक्त असे व्हीआयपी ऑटोमॅटिक कार वाशिंग सेंटरचा शुभारंभ आज होणार असल्याची माहिती संचालक प्रतीक मोहन लेंडवे यांनी दिली आहे.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक रामकृष्ण नागणे, पक्षनेते अजित जगताप, माजी सभापती प्रदीप खांडेकर,
नगरसेवक प्रशांत यादव, प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी, शिक्षक नेते संजय चेळेकर, दामाजी नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा वडतीले, उद्योजक अर्जुन नागणे, महेश हजारे आदीजण उपस्थित राहणार आहेत.
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर मंगळवेढा-दामाजी कारखाना रोडवरील बायपास चौकात सर्व सोयींनीयुक्त असे स्वयंचलित व्हीआयपी वाशिंग सेंटर सुरू होत असल्यामुळे ग्राहकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.
अवघ्या कमी मिनिटांमध्ये पूर्णपणे फुल वॉश
ग्राहकांना आपली गाडी अवघ्या कमी मिनिटांमध्ये पूर्णपणे फुल वॉश करून दिली जाणार आहे. अत्यंत माफक दरात आपले वाहन फुल वॉश करून दिले जाणार आहे.
बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था/ब्रॅण्डेड पॉलीश व शाम्पू
आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था (वेटिंग रूम) देखील करण्यात आली आहे. व्हीआयपी ऑटोमॅटिक कार वाशिंग सेंटर तर्फे ब्रॅण्डेड पॉलीश व शाम्पू मुळे आपली गाडी एकदम चकाचक दिसणार आहेत.
कार किंवा टू व्हीलरची देखभाल आणि स्वच्छता हा नेहमीच कटकटीचा मुद्दा असतो. हवेतील प्रदूषण, आद्र्रता आणि धूळ हे घटक गाडी कुरूप करण्यात भर पाडतात, विशेषत: महामार्गावरून प्रवास करताना अगदी छोटे छोटे धूलिकण गाडीला घट्ट चिकटून बसतात.
रंग आणि चमकही वाढणार
वेळीच स्वच्छ न केल्यास या कणांचे हळूहळू थर साचत जातात आणि त्यामुळे गाडी केवळ अस्वच्छच होत नाही, तर तिचा रंग आणि चमकही उडू लागते. म्हणूनच गाडीची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक बनते.
म्हणूनच व्हीआयपी ऑटोमॅटिक वॉशिंग सेंटर यांनी ग्राहकांच्या सोयीकरता ही सेवा सुरू केली आहे.
सध्या ऑटोमॅटिक कार वॉश सेंटर सुरू झाल्यामुळे काही लोक त्या पर्यायाचा देखील वापर करीत आहेत. गाडीला चकचकीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे तुमची गाडी जास्त काळ चकचकीत ठेवण्यात मदत होते.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतीक मोहन लेंडवे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज