मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढयाचे नुतन डी.वाय.एस.पी.विक्रांत हिम्मतराव गायकवाड यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना त्यांनी दिली.
विदयमान डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांची बदली पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेकडे झाली असून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान त्यांच्या जागेवर धर्माबाद जि.नांदेड येथून विक्रांत गायकवाड हे आले असून त्यांनी मंगळवेढयाचे 10 वे डी.वाय.एस.पी.म्हणून आपल्या पदाची सुत्रे नुकतीच स्विकारली आहेत.
ते मुळचे भाटनिमगांव ता.इंदापूर जि.पुणे येथून असून ते 2016 साली पोलिस सेवेत दाखल झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत गडचिरोली, नांदेड येथे आपली सेवा बजावली असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, त्यांच्यापुढे कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक, कर्नाटक मधून येणारा गुटखा, जुगार अड्डे, गावागावात बोकललेले दारू धंदे रोखण्याचे आव्हान असणार आहे.
कारखाना बायपास रोडने येथील नागरिक पहाटे फिरायला जात असतात. या बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक नागरिकांनी फिरायला जाण्याचे बंद केले आहे.
अवैध वाळू घेऊन येणारे टिपर भरधाव वेगाने येत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वेळीच याला जर आळा घातला तर येणारा प्रसंग टाळता येऊ शकतो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज