टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. क्रिकेट खेळत असताना गुप्तांगाला चेंडूचा फटका लागून एका तरुणाचा जीव गेला आहे.
ही घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या मैदानात घडली. विक्रम गणेश क्षीरसागर (वय ३५) असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे मैदानात क्रिकट खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका लागला.
यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यानच विक्रमचा मृत्यू झाला.
तावशी येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धेच्या वेळी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली. गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना विक्रम क्षीरसागर नेपातगाव या टीमकडून बॅटिंग करत होता.
यावेळी समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला. या घटनेत विक्रमचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मात्र, यावेळी लागणारी संरक्षक साधने, गार्डस या वस्तू खेळाडूंकडे नसल्याने असे प्रकार घडतात.
क्रिकेट खेळताना अनेकदा तरुणांना डोक्याला मार लागणं किंवा इतर इजा होणं, अशा घटना अनेकदा समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेल्या घटनेत या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज