टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी अकलूज येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी परिसरातून सुमारे एक लाख लोक येतील, असा अंदाज संयोजकांनी केला आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेली आंदोलनाची धग गावागावांत पोहोचत आहे. आंतरवाली येथील जाहीर सभेने जागतिक विक्रम केला.
या सभेनंतर जरांगे पाटील जनजागृतीसाठी राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर शनिवारी सभा होत आहे.
त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता उपस्थितांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करण्यात आला आहे. शिवाय १० डॉक्टरांची टीम तसेच १० रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र सोय…
महिलांसाठी क्रीडा संकुलाच्या दोन्ही गॅलरीत बसण्याची स्वतंत्र सोय केली आहे. सभेसाठी निमगाव, पिलीव, आटपाडी तालुक्यातून लोकांसाठी यशवंतनगर रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे, माळशिरस,
नातेपुते व पश्चिम भागातून येणाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे तर पूर्वेकडून वेळापूर, बोरगाव, म्हाळुंग या भागातून येणाऱ्या लोकांसाठी क्रीडा संकुलाच्या पाठीमागे, तसेच श्रीराम चित्रमंदिराच्या जवळ पार्किंगची सोय केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज