पंढरपूर । राजेंद्र फुगारे
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. अभिजीत पाटील यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल सह. साखर कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आ.अभिजीत पाटील सत्कार समिती, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, अधिकारी व कर्मचारी वर्ग,
श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विठ्ठल कृषी महाविद्यालयाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दि. १ रोजी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, उद्या शनिवार दि. २ रोजी सर्वरोग तपासणी शिबीर, वृक्षारोपण, मुकबधीर शाळा, बाभुळगांव येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान, वृक्षारोपण
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या ४२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.१) दिवसभर कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक आर.बी. पाटील यांनी दिली.
चेअरमन आ. पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत कारखाना कार्यस्थळावर सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाभुळगांव येथील बुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात येणार असून त्या ठिकाणीही वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कारखान्याचे सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक आर.बी. पाटील, सरव्यवस्थापक डी. आर. गायकवाड, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य विठ्ठलराव नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कामगार, शिक्षक या कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सरव्यवस्थापक गायकवाड यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज