टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४, निवडणूक खर्च संनियंत्रण यांवरील अनुदेशांचा सारसंग्रह जानेवारी २०२४ अन्वये
सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची खर्चाच्या नोंदवह्या तपासणीत ‘इंडिया आघाडी’च्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे,
‘महायुती’चे उमेदवार आ.राम सातपुते यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत दिसून आल्याने दोन्ही उमेदवारांना नोटीस बजाविण्यात आले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक संनियंत्रण पथकाकडून खर्च निरीक्षक उमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सात रस्ता परिसरातील
शासकीय विश्रामगृह येथे ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलाची तपासणी करण्यात आली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
या तपासणीत आ.प्रणिती शिंदे व आ.राम सातपुते या दोन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने त्यांना या फरकाबाबत खुलासा करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
खर्चाच्या तपासणीवेळी नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण, सर्व सहाय्यक खर्च निरिक्षक, खर्च संनियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज