मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या १०४ टक्के भरले असून धरणात दौंडवरून सहा हजार क्युसेकची आवक येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उजनी धरणातून भीमा नदीत १६०० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हे पाणी विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडले जात आहे.
सोलापूरसह पुणे, नगर व धाराशिव या शहर-जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दीड ते पावणेदोन लाख हेक्टरला उजनीचे थेट पाणी मिळते.
याशिवाय १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा, सोलापूर, धाराशिव, कर्जत, इंदापूर अशा शहरांचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना उजनीचाच आधार आहे.
उजनी भरल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली आहे. १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीतून आता भीमा नदीत १६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
सध्या कालव्यातून ३०० क्युसेक, दहिगाव व सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधून २६० क्युसेक आणि बोगद्यातून ४०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. दौंडवरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीतील विसर्ग वाढू शकतो, असे उजनी धरण पूरनियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे.
दोन महिन्यांत सोडले ६३ टीएमसी पाणी
पावसाचा अंदाज घेऊन पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून पहिल्यांदा २० जून रोजी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून १८ ऑगस्टपर्यंत उजनी धरणातून कालवा,
बोगदा, उपसा सिंचन योजना व भीमा नदीतून एकूण ६३ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती उजनी धरण पूर नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज