टीम मंगळवेढा टाईम्स।
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत गैबीपीर यांच्या उरूसास मंगळवार दि.२१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती गैबीपीर उरूस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
मंगळवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रवेशद्वाराचे उदघाटन रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचे हस्ते व व्हाईस चेअरमन रामचंद्र जगताप यांचे अध्यक्षतेखाली होणार असून
सायं. ७ वा. कळसाची भव्य मिरवणुक व देवाचा गंध या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांचे हस्ते व जकराया शुगरचे चेअरमन अॅड.बी.बी.जाधव यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
बुधवार दि.२२ रोजी पहाटे ५ वाजता शोभेच्या दारूकामाचे उदघाटन श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते
व माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सकाळी १० वाजता महाप्रसादाचे वाटप माजी नगरसेवक शरीफ सुतार यांचे हस्ते व फॅबटेक शुगरचे माजी चेअरमन सरोज काझी यांच्या अध्यक्षतेखाली येणार आहे.
तर सायं. ७ वा. दिल्लीचे संसद भवन कव्वाली फेम चाँद कादरी यांच्या जंगी कव्वालीच्या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार समाधान यांच्या हस्ते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
गुरुवार दि.२३ रोजी सायं.४ वाजता जंगी कुस्त्याचे उदघाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य भगिरथ भालके यांचे हस्ते व मंगळवेढा तालुका खरेदी विक्री परिश्रम घेत आहेत.
संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सायं. ७ वाजता भारतीय संगीत कव्वाली मंच, मुंबईच्या शाहीन,
शबनम व हैदर नाझा यांच्या जंगी कव्वालीचा मुकाबला कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते व संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शुक्रवार दि.२४ रोजी सायं. ४ वाजता जंगी कुस्त्याचे उदघाटन आवताडे आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
शनिवार दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता कुरआनखानी व रात्रौ ९ वाजता मौलुद शरीफ असे धार्मिक कार्यक्रम होणार असून हा उरूस यशस्वी करण्यासाठी उरूस कमिटीचे सर्व सदस्य व हिंदू मुस्लिम बांधव परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज