टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांची बैठक मंगळवेढा उपसा सिंचन योजना व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न संदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी 24 गावचे सरपंच पदाधिकारी व शेतकरी बंधू यांची
एकत्रित बैठक पाटकळ येथे आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11. 00 वाजता . ग्रामपंचायत कार्यालय, पाटकळ येथील ओपन सभामंडपात आयोजित करण्यात आलेली आहे.
आपल्या भागातील शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न व जनावरांच्या चाऱ्यांच्या प्रश्न संदर्भात लढा उभा करण्यासाठी आपण उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीने केले आहे.
दरम्यान, मार्च महिन्यापासून या भागातील शेतकऱ्यांची व जनावरांची अवस्था खूपच बिकट होणार असल्यामुळे हा लढा उभा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील कायम दुष्काळी 24 गावे खालील प्रमाणे –
खूपसंगी, लेंडवे चिंचळे, शिरशी, गोणेवाडी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, खडकी, जुनोनी, पाटकळ, येड्राव, जित्ती, जाळीहाळ, हाजापुर, सिद्धन्केरी, खवे, भाळवणी, निंबोणी, रड्डे, गणेशवाडी, हिवरगाव, मेटकरवाडी, शेलेवाडी, भोसे, नंदेश्वर
शेतीच्या पाण्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कायम दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज