टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवघ्या मंगळवेढेकरांचे लक्ष लागलेल्या अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत महेंद्र गायकवाडने विजय मिळवला. महेंद्र गायकवाडने पंजाबच्या भोला पंजाबला आस्मान दाखवलं.
या दोन्ही मल्लांनी हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यरितीनं आयोजित केलेल्या या कुस्ती स्पर्धेकडं अवघ्या सोलापूर जिल्हावाशीयांचे लक्ष लागलं होतं.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील सलगर(बु) येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड व पंजाबचे पै. भोला पंजाब यांच्यात लढत झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले.
तर दोन नंबर ला पै.संतोष जगताप व पै.संदेश ठाकुर यांच्यात लढत झाली यामध्ये पै.संतोष जगताप यांनी दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
यावेळी शंभर होऊन जास्त छोट्या-मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यावेळेस सलगर व मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कुस्तीप्रेमी खेळाडू, भैरवनाथ शुगरचे कर्मचारी व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
या भागामध्ये प्रथमच भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान कुस्ती स्पर्धेपूर्वी अनिल(दादा) सावंत यांची सावंत प्रेमीनी सलगर गावातून मिरवणूक काढली व त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा शिवसेनेचे सोलपूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.प्रा.श्री शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी व्हाईस चेअरमन मा.श्री.अनिल(दादा) सावंत व डॉ.आदित्य सावंत उपस्थित होते. यावेळेस बसवराज पाटील, राजू पाटील, दत्ता सावंत, प्रशांत भोसले, महाराष्ट्र केसरी अर्जुन पवार, पै.शंकर पुजारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.महेंद्र देवकाते,
पै.वाकडे, ,पै.घुले इत्यादी पंचानी या संपूर्ण कुस्त्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सलगरचे माजी सरपंच रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर गुरुजी, तानाजी चव्हाण, इंद्रजीत पवार व अशोक निकम यांनी केले होते.
यावेळी आप्पा माने सरकार, तानाजी काकडे, गेना दौलतोडे, दादा दौलतोडे, गुलाब थोरबोले, मच्छिंद्र खताळ, होळकर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्र संचालन धनाजी मदणे व दामोदर घुले यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज