मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ग्रामपंचायतीने बोलविलेली विशेष ग्रामसभा दारूविक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या विषयावरून चांगलीच गाजली.
सभेदरम्यान आंदोलनकर्ते धनाजी गडदे आणि आकाश डांगे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. ग्रामसभेला पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला.
चार विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती.
या ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच दारू विक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास आत्मदहन करू, असा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, भाजपचे आकाश डांगे आणि दत्ता साबणे यांनी दिला होता.
सभेत दारूविक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय आल्यानंतर अचानक गोंधळ सुरू झाला. या गोंधळात आंदोलनकर्ते धनाजी गडदे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांसह बंदोबस्तासाठी आलेले पोलिसांचीही त्रेधातिरपीट उडाली. वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला.
विशेष ग्रामसभा का बोलवण्यात आली ?
दारूविक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या विषयावर विशेष ग्रामसभा का बोलवण्यात आली ? विषय क्रमांक चार अनुव्याप्ती सी. एल. श्री ना हरकत प्रमाणपत्र याचा विषय ग्रामसभेत निघाल्यानंतर सरपंच ग्रामसभा सोडून गेले. – आकाश डांगे, आंदोलनकर्ते
कुटुंबातील सदस्य दारू विक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागत आहेत
२०१५ साली तत्कालीन सरपंचांनी अवैध दारू विक्रीला विरोध करत बाटली आडवी केली आणि आता झालेल्या विशेष ग्रामसभेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य दारू विक्री परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागत आहेत. याची चर्चा सध्या नंदेश्वर गावात चौकाचौकात होत आहे. • धनाजी गडदे, तालुकाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा
विरोध करणारे गावात अवैध दारू विक्री करीत आहेत
ग्रामसभा संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला दमदाटी करीत त्याच्याकडून कागदावर काहीतरी लिहून घेतले आहे. अनुव्यापी सी. एल. श्री ना हरकत प्रमाणपत्राला विरोध करणारे गावात अवैध दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे या आंदोलनाला काडीमात्र अर्थ नाही. • सजाबाई गरंडे, – सरपंच, नंदेश्वर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज