मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या पिण्याच्या पाणी सिमेंट टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून ते दुषीत करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, शिरसी येथे जिल्हा परिषद शाळा असून येथे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सात शिक्षक कार्यरत असून दि.२८ रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान नेहमी प्रमाणे शाळा भरली होती.
दुपारी २ वाजता यातील फिर्यादी प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश तुकाराम कुंभार हे व वर्गशिक्षक शिवाजी लेंडवे बोलत बसलो होतो. त्यावेळी सहावी वर्गातील विदयार्थी शंभू लहूजी गायकवाड हा ऑफिसमध्ये आला व त्याने टाकीतील पिण्याच्या पाण्याचा उग्र वास येत असल्याचे सांगितले.
तात्काळ मुख्याध्यापक व वर्गशिक्षक शिवाजी लेंडवे, सिध्दनाथ पाटील, भारती माने आदी शिक्षकांनी टाकीमध्ये असलेल्या पाण्याचा वास घेतला असता तीव्र घाण स्वरुपाचा वास येत होता.
लागलीच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहूजी गायकवाड, उपसरपंच शहाजी आवताडे यांना ही माहिती कळविल्यावर ते टाकीजवळ हजर झाले. त्यांनीही पाण्याचा वास घेतला असता तीव्र घाण वास आला.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये कोणतेतरी औषध टाकून ते दुषीत करुन घाण केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान यावेळी पोलीस पाटील तानाजी गायकवाड, पालक दत्तात्रय कांबळे, उपशिक्षक रावसाहेब मोरे, सिध्दनाथ पाटील, शंकर बबलादे, भारती माने, शहाजी आवताडे आदींनी यावेळी घटनास्थळाला भेट दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज