मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे. एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.
त्यामुळे या मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसरणार आहेत. मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला.
त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळांचं सख लाभलं आहे.
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांच्या हास्याने घर खुलणार आहे.
अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत.
या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ.देसाई, डॉ.सलमा इनामदार, डॉ.खडतरे, डॉ. झेंडे, डॉ.दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली
एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज