मंगळवेढा : समाधान फुगारे
शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शहा कुटुंबानी मंगळवेढयाचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी केले आहे. ते रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते बळीरामकाका साठे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,
विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष उमेश पाटिल, रामचंद्र जगताप, लतीब तांबोळी,
जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, रामचंद्र वाकडे, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, दामाजी शुगरचे माजी संचालक रामकृष्ण नागणे, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन नीलाताई आटकळे आदि मान्यवर उपस्थित होते.
साठे पुढे बोलताना म्हणाले की, तीन पिड्यांची परंपरा असलेल्या शहा कुटुंबांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.
अगदी लहान वायांमध्ये सर्व जबाबदारी राहुल शहा यांच्याकडे आली, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शहा कुटुंबासोबत आम्ही काम केले. राहुल शहा यांनी गोरगरीब जनतेला पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे पाटील, मंगळवेढा शहराचा विकास लिहीत असताना शहा व मारवाडी वकील या दोन नावा शिवाय इतिहास पूर्ण होत नाही. बँकेची जबाबदारी राहुल शहा यांच्याकडे पडल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी नेटाने सांभाळली आहे.
राहुल शहा चेअरमन झाल्यानंतर अडचणीत असणारी बँक फायद्यात आणली. सर्वसामान्य जनतेकडे याची नोंद राहील, स्व.सुभाष शहा यांच्या नंतर राहुल शहा यांनी सहकार क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्र ही सांभाळले.
प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले की, मंगळवेढयातील सर्व जणांना एकत्र करून विकासासाठी शहा कुटुंबानी मोठे योगदान दिले आहे. शहराची जडण-घडण करण्यात मोलाचा वाटा उचलला, राहुल शहा यांचा पिंड राजकीय नसून अत्यंत सयंमी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
राहुल शहा हे एक यशस्वी उद्योजक म्हणून पूढे आले आहेत, बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. कर्ज घेणारा निवांत जोपत असतो कर्ज देणारा रात्रभर जागत असतो, राहुल शहा यांनी संस्था ठिकवून मोठ्या दिमाखात नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
भविष्यात मंगळवेढेकरांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपण प्रामाणिक पध्दतीने काम करत आहात, याची पोच पावती आपल्याला मिळत राहील असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना राहुल शहा म्हणाले, सगळ्या सहकारी मित्रांनी वाढदिवसासाठी हट्ट करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. स्व.रतनचंद शहा यांनी शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी सामाजिक विकास करत 1962 साली बँकेची स्थापना केली.
गावातील विद्यार्थ्यांची हेळसांड पाहून त्यांनी शाळा सुरू करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले.
शरद पवार साहेबांनी देखील आमच्या कुटुंबासोबत गावाच्या विकासासाठी वेळोवेळी मदत केली आहे. सर्व सहकाऱ्यांनी योगदान दिले व तत्वावर काम करून सर्व कारभार पारदर्शक केला.
गरिबांच्या मुला मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आजही प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्व सभासदांनी दिलेला विश्वास पाहता बँक फायद्यात आहे. बँकेने सर्व अत्याधुनिक सेवा सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.पी.बी पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझफर काझी, सोमनाथ माळी, प्रतीक किल्लेदार, डॉ.एन बी पवार, सुरेश कोडक, शंकर आवताडे, सदाशिव कुलकर्णी, भीमराव मोरे, विनायक कलुबर्मे यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर कोंडूभैरी, सूत्रसंचालन भारत मुढे तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज