टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अखेर ठरला असन सोलापूर शहरातील होम मैदानावर मंगळवारी दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून ३५ ते ४० हजार महिला लाभार्थी घेवून येण्यासाठी ४०० बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत.
लाभार्थी आणायची जबाबदारी प्रत्येक तहसीलदारांवर सोपविण्यात आली असून त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, गटविकास अधिकारी यांना कामाला लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले, सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
सोहळ्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची व्यवस्था चांगली व्हावी, प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, प्रत्येक बसमध्ये एक तलाठी असेल ते सर्व महिलांना व मैदानापर्यंत घेऊन येणे व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गावी सोडतील.
प्रत्येक बसमध्ये पाणी व अन्य सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी, मोबाईल टॉयलेट व आरोग्य पथक असावे, कार्यक्रमाचे व्यासपीठ, विद्युत पुरवठ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, प्रोटोकॉलप्रमाणे व्यासपीठ तयार करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी व्हावी, यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.
३० महिलांना मिळणार व्यासपीठावर लाभ
जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाने ३० लाभार्थी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार ठेवावी. त्यांना व्यासपीठावर बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते लाभ दिला जाणार आहे.
तसेच जिल्ह्यातील दहा लाख ३४ हजार माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाले असून अनेकांना दोन तर काहींना तिसरा हप्ता मिळाला आहे. उर्वरित लाभार्थींनाही काही दिवसांत लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील आकडेवारी देखील तयार ठेवण्याचे आदेश महिला व बालविकास कार्यालयास देण्यात आले आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज