टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभा निवडणूक २०२४ साठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघांतर्गत ८५ वर्षापुढील ४८५ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग नागरिक स्वतःच्या घरूनच मतदान करणार आहेत.
त्याबाबत नियोजन झाले असून २५ ते २८ एप्रिल दरम्यान हे मतदान होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग नागरिकांना स्वतःच्या घरूनच मतदान करण्याची व्यवस्था केली आहे.
आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना घोषित झाल्यानंतर पाच दिवसापर्यंतच स्वतःच्या घरूनच टपाली मतदान पत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिक यांचे ऐच्छिक स्वरूपाचे अर्ज भरून घ्यावयाचे असतात.
त्यासाठी बीएलओ मार्फत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांचे फॉर्म भरून घेतले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ७ हजार ज्येष्ठ नागरिक
व दिव्यांगापैकी जवळपास फक्त ५३३ नागरिकांनीच ऐच्छिक स्वरूपाचे अर्ज भरून दिले आहेत. यामध्ये दिव्यांग नागरिकांसाठी सर्टिफिकेट अनिवार्य असते.(स्रोत; लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज