मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आपल्या भाच्याच्या वाढदिवसाला आलेल्या मामाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे घडली आहे.
यशवंत मुगदप्पा बीटागेरी (वय 17 रा.हवेरी जि.हवेरी रा.कर्नाटक) असे मयत झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी आप्पा ज्ञानेश्वर डांगे (वय 32 रा नंदेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत यशवंत मुगदप्पा बीटागेरी याची बहिण नंदेश्वर येथे असून भाच्याचा वाढदिवस असल्याने यशवंत आला होता.
काल सकाळी 9 च्या सुमारास फिर्यादी घरी असताना फिर्यादीचा मेव्हुना यशवंत यास हाक मारत असताना त्या वेळी फिर्यादीची पत्नी यशोदा ही म्हणाली की यशवंता हा शेतात गेला आहे. तो अजुन परत आला नाही
त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी असे दोघेजन शेतात गेले फिर्यादी त्यास हाक मारत होतो परंतु त्याचा काही आवाज आला नाही.
फिर्यादी नवरा बायको असे शेतातील शेत तळ्याकडे गेले असता शेत तळ्यातील पाण्यात यशवंत हा तरंगताना दिसला फिर्यादीने त्यास लगेच बाहेर काढले लगेच गावातील कलावती झेंडे यांचे दवाखाण्यात घेवुन गेलो असता
त्यांनी त्यास लगेच मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्नालय येथे घेवुन जाण्यास सांगीतले त्या वेळी आम्ही त्यास घेवुन ग्रामीण रुग्नालय मंगळवेढा येथे घेवुन आलो असता तेथील डॉक्टरेन तो मयत झाला असल्याचे सांगीतले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज