mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद! उजनीची शंभरीकडे वाटचाल; मागील वर्षीची सर्वोच्च पातळी ओलांडली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 2, 2024
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगला वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पहिल्याच टप्प्यात चांगला पाऊस झाला आहे.

त्यामुळं उजनी धरणाने गेल्यावर्षीची पाणी साठवण पातळी ओलांडली आहे. आता धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरु झाली आहे.

सध्या उजनी धरणात 66.50 टक्के एवढा पाणीसाठा

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण भरणार नाही याचा अंदाज सर्वांना होता. अखेर दुसऱ्या टप्प्यात थोडा चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर 2023 रोजी उजनी धरण 60.66 टक्के एवढे भरले होते. त्यामुळं वर्षभर पाणी टंचाईची टांगती तालावर सातत्याने समोर होती.

काल म्हणजे 1 ऑगस्ट रोजी दुपारी उजनी धरणाने गेल्यावर्षीची पाणी पातळी ओलांडून शंभरीकडे प्रवास सुरु केला आहे.

आज सकाळी उजनी धरणात 66.50 एवढा साठा झाला असून 30 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी धरणाकडे येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात पावसाची ये जा सुरु असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील सातत्याने बदलत आहे. धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरु आहे.

आज दुपारपर्यंत धरणात 100 टीएमसी पाणी जमा होणार

सध्या उजनी धरणात 99 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा असून, आज दुपारपर्यंत धरणात 100 टीएमसी पाणी जमा होणार आहे. उजनी धरणाची सुधारत चाललेल्या पाणीपातळीमुळं बळीराजा आनंदी आहे. उजनी धरणावर परिसरातील 40 पेक्षा जास्त साखर कारखाने अवलंबून आहेत. त्यामुळं उजनी धरण 100 टक्के भरणे सर्वांसाठीच खूप महत्वाचे आहे.

उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं

उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे.

मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं होतं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांना पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे.

उजनी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यासाठी पुणे जिल्ह्यात देखील चांगल्या पावसाची गरज असते.

कारण, पुणे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या धरणातून पाणी उजनीत सोडले जाते. त्यामुळं क्षमतेनं मोठं असणारं धरण देखील वेगाने भरते. त्यामुळं उजनी धरण लवकर भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरण शंभरी

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

माढा की पंढरपूर? अभिजित पाटील कोठून निवडणूक लढवणार? पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार, पाटलांनी विधानसभेसाठी फुंकले रणशिंग, वाढदिवसाला मोठं शक्तिप्रदर्शन

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा