पावसाची तुफान बँटिंग ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे तशीच ती उजनी जलाशयावर बुधवार 14 ऑक्टोंबरला सकाळपासून सुरूच आहे. उजनी व परिसरात दुपारी चार वाजेपर्यंत 74 मिलीमीटर पावसाची नोंद होती.
पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातून दुपारी 15 हजार यानंतर 40 हजार , साडेचार वाजता 50 हजार तर यानंतर 60 हजार तर साडेपाच वाजता 1 लाख तर सायंकाळी सर्व साडेसहा वाजता 1 लाख 20 हजार क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडले जात आहे.वीजनिर्मिती साठी 1600 क्युसेकचा विसर्ग आहे.तर वीर धरणातून 23 हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे.
यामुळे भीमानदी दीड लाख क्युसेक हून अधिक विसर्गाने वाहणार आहे.यातच भीमा व नीरा काठी पावसाचा जोर असल्याने भीमाकाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी संगमचा विसर्ग 33 हजार तर पंढरपूर चा 35 हजार क्युसेक होता. तो आता वाढत जाईल. बुधवारी दिवसभर सोलापूर जिल्ह्यात ही भीमाकाठी पावसाचा जोर असल्याने पाणी पातळीत लक्षणीय वाढ होईल.
उजनीमधून 1 लाख तर वीरमधून 14 हजार क्युसेकचा विसर्ग , भीमाकाठी सावधानतेचा इशारा
सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे बुधवारी उजनीतून भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता.
उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसानं उजनीत पाणी वाढलं असून आता उजनी तसेच वीर धरणातून भीमेत पाणी सोडले जात असून भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.पावसाची तुफान बँटिंग ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे तशीच ती उजनी जलाशयावर बुधवार 14 ऑक्टोंबरला सकाळपासून सुरूच आहे.
उजनी व परिसरात दुपारी चार वाजेपर्यंत 74 मिलीमीटर पावसाची नोंद होती. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातून दुपारी 15 हजार यानंतर 40 हजार , साडेचार वाजता 50 हजार तर यानंतर 60 हजार तर साडेपाच वाजता 1 लाख क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडले जात आहे.
वीजनिर्मिती साठी 1600 क्युसेकचा विसर्ग आहे. वीर धरणातून 14500 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे . यामुळे भीमानदी भरून वाहत आहे.
यातच भीमा व नीरा काठी पावसाचा जोर असल्याने भीमाकाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी संगमचा विसर्ग 33 हजार तर पंढरपूर चा 35 हजार क्युसेक होता. तो आता वाढत जाईल. बुधवारी दिवसभर सोलापूर जिल्ह्यात ही भीमाकाठी पावसाचा जोर असल्याने पाणी पातळीत लक्षणीय वाढ होईल.
सोलापूर जिल्हा परिसर
पंढरपुरात आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटा वरील एक दगडी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात काल सकाळी 8:30 वाजल्यापासून आज सायंकाळी 5:30 पर्यंत 138.4 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे .
गेल्या अनेक वर्षात हा संततधार पाऊस सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रथमच झाला असून ग्रामीण भागात ओढे-नाले नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे .
सोलापूर शहराच्या अनेक भागात आज सकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी घराघरात पाणी शिरलं यामुळे नागरिकांच्या वित्तीय मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे.
आणखीन दोन दिवस सर्वत्र पावसाची शक्यता आहे, यामुळे ज्याचे शेत तलावात भरुन पाणी आहे, त्यांनी सांडव्याची व्यवस्था करावी असे आवाहन कृषी विभागाने केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज