टीम मंगळवेढा टाइम्स ।
वजा (उणे) झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 80 टक्के भरले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 107 टीएमसी इतका झाला आहे.
धरणात सध्या दौंडवरुन 65 हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे उजनी धरण सोमवारी 100 टक्के (117 टीएमसी) भरेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 42 टीएमसीपर्यंत (79 टक्क्यांपर्यंत) पोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे. पण, पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100 टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सद्य:स्थिती आहे.
उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळींब, ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 62 हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचे ठोस नियोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गतवर्षी ६६ टक्केच भरले अन् उन्हाळ्यात उणे ६० टक्के झाले, आता…
गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे उजनी धरण ६६ टक्केच भरले होते. उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ६० टक्क्यांपर्यंत पोचला होता.
पाऊस लांबला असता तर जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र झाली असती, अशी परिस्थिती होती. पण, यंदा उजनी पावसाळा दोन महिने शिल्लक असतानाही 80 टक्क्यांपर्यंत भरत असल्याची स्थिती आहे.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज