टीम मंगळवेढा टाईम्स ।
इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन पेट्रोल पंपाच्या जाहिरातीसाठी लहान मुले शुटिंगकरिता पाहिजेत म्हणून गोव्यातील परप्रांतीय तरुणाने दोन महिलांचा विश्वास संपादन केला.
मुलीच्या अॅडमिशनसाठी म्हणून व अल्बम साँग अडकल्याचा बनाव करून दोघींकडून सुमारे ७८ हजार ५०० रुपये उकळून त्यांची फसवणूक केली.
हा प्रकार ७ एप्रिल ते २५ जून या कालावधीत सांगोला व गोवा येथे घडला. याबाबत मुस्कान इमरान मुलाणी (रा. महूद रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदीप पाटील (रा. गोवा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी, मुस्कान मुलाणी हिची मैत्रिणीने १५ मार्च रोजी इंस्टाग्रामवर तिने शुट केलेला व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावेळी त्याने त्याला तुम्ही पण गोवा या ठिकाणी शुट करता काय, अशी कमेंट केली होती.
या दोघींना गोव्यात नेऊन शुटिंग केली. त्यानंतर पेट्रोलपंपाच्या जाहिरातीसाठी लहान मुले लागणार असल्याचे सांगून १०५०० रुपये फी घेतली आणि पैसे परत देताना फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज