टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारू विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे.
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
मागील काही महिन्यात उत्पादन शुल्क विभागाने विविध ढाबे, हॉटेलवर कारवाया करून अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई केली आहे. यात अनेकांना अटक करून दंडही करण्यात आला आहे.
खा.प्रणिती शिंदेंनी स्टंटबाजी सोडून कामाला लागावे; समाधान आवताडेंनी केली टिका
तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळाले याचे आत्मपरीक्षण करून निवडणूक निकालानंतर करत असलेली स्टंटबाजी सोडा आणि कामाला लागा असा खोचक टोला आ. समाधान आवताडे यांनी लगावला.
तालुक्यातील कात्राळ येथे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या व काम पूर्ण झालेल्या विकास कामाच्या उद्घाटन समारंभा नंतर ते पत्रकारांशी बोलत होते
यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, विजय माने, सरोज काझी, तानाजी काकडे,राजन पाटील, जगन्नाथ रेवे, शिवाजी पटाप नंदू जाधव पप्पू काकेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की, लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या मतदार संघात मराठा आरक्षण, कांद्याचा प्रश्न, दुध दराचा प्रश्न,संविधाना विषय आधी प्रश्नावरून चर्चा होती मात्र लोकसभा निवडणुक विकासाच्या मुद्द्यावर न होता एका विशिष्ट समाजावर गेली.
आणि ते समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मते देखील मिळाले नाही. या निवडणुकीदरम्यान खोटा नोटा प्रचार देखील करण्यात आला.
त्यामुळे आम्हाला 45 हजार कमी मते मिळाली मतदारानी दिलेला कौल मान्य करतो मात्र विजयी झालेल्या खा. प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांनी तीन टर्म ज्या मतदारसंघातून काम केले त्या मतदारसंघात कमी मते का मिळाली. याचा आत्मपरीक्षण देखील करावं.
असे सांगून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मताधिक्यावर भगीरथ भालके यांचे नाव न घेता घरात बसून घरात कुठे लीड मिळत असतं का ? असा खोचक टिपणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.
दोन दिवसांपूर्वी खा. प्रणिती शिंदे यांनी आंधळगाव,लक्ष्मी दहीवडी,मारापूर या गावाच्या गावभेट दौऱ्यात अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आ. अवताडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता मात्र यावर आ.अवताडे यांनी सडेतोड उत्तर दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज