मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
प्रतिष्ठा आणि स्टाईल म्हणून फिरवली जाणारी टू स्टोक मोटारसायकलींचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे जुन्या गाड्या मॉडिफाय करून शहरातून रूबाबात फिरणारी मंडळी दिसून येतात. याच गाड्यांना लक्ष करत तब्बल बारा दुचाकी चोरणाऱ्यास सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे.
संकेत तानाजी ढगे (वय २१, निंबोणी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने सांगली शहरासह आष्टा, सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतून गाड्या चोरल्याची कबुली पथकाला दिली आहे. त्यानुसार एकाच मॉडेलच्या सात लाख वीस हजारांच्या बारा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
घटनेची माहिती अशी, की एकाच कंपनीची दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने कारवाईचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीला दिले होते. त्यानुसार निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक वाळवा परिसरात गस्तीवर होते.
रेकॉर्डवरील गुन्हेगार संकेत ढगे हा विना नंबरची दुचाकी घेवून बावची फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती पथकातील अंमलदार उदय माळी, महादेव नागणे, विक्रम खोत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून सापळा रचला.
संशयित दुचाकीवरुन फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची दुचाकी ही सांगलीतील शिवशंभो चौकातून चोरल्याची कबुली दिली.
तसेच त्याने यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकी त्याचा बावची येथील मित्राच्या घरानजीक लावल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली असता तेथून तीन दुचाकी आढळल्या.
संशयित संकेत ढगे याने अन्य सात दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ लावल्याचे सांगितले.
तेथूनही पोलिसांनी दुचाकी हस्तगत केल्या. संशयित संकेत याच्यावर आष्टा आणि मंगळवेढा पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. निरिक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
सहायक निरीक्षक पंकज पवार, अंमलदार सागर लवटे, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, संदीप नलावडे, विक्रम खोत, दऱ्याप्पा बंडगर, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने कारवाई केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज