मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील सतिश चंद्रकांत तेली यांच्या किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी
मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारासाठी अर्थसहाय्य रूपामध्ये २ लाखांची मदत प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सलगर खु. येथील सतिश तेली यांच्यावर कवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल लिमिटेड तामिळनाडू येथे किडनी प्रत्यारोपण उपचार सुरू आहेत.
परंतु तेली यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने सदर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी तेली परिवारातील सदस्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला.
आमदार आवताडे यांनीही तेली परिवारास उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करून तेली यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अखेर आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांतून सतिश तेली यांच्या शासकीय बँक खात्यावर दोन लाख रुपयांची आरोग्य मदत जमा झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज