टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या काही महिन्यापासून शिथिलता दिल्यानंतर दिलासा मिळालेल्या मंगळवेढेकरांना काल धक्का बसला आहे.
गुरुवार दि.6 जानेवारी रोजी दोन कोरोना रूग्ण सापडल्याने मंगळवेढावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, नव्या विषाणूचा शिरकाव राज्यात झाला असून सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन नगरपालिकेचे अधिकारी विनायक साळुंखे यांनी केले आहे.
मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर ग्रामपंचायत हद्दीतील एक व्यक्ती काल तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेला होता.
तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ माजली आहे.
घरी हा रुग्ण कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याची तातडीने माहिती घेऊन सर्वांची तपासणी केल्यानंतर घरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
लक्षणें नसणारा हा व्यक्ती पॉझिटिव आल्याने आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान मंगळवेढा शहर , संत दामाजी नगर ग्रामपंचायत व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांनी कोणतेही लक्षणे अंगावर न काढता त्वरित रुग्णालयात दाखवावे व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज