टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात पहाटे सरासरी २.७५ मिलीमीटर अवकाळी पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे झाली आहे.
दरम्यान, या दिवशी वीज पडून दोन म्हशी, एक रेडीचा मृत्यू झाल्याची नोंद २५ एप्रिल रोजी महसूल प्रशासनाकडे झाली आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात शनिवारी पहाटे अचानक वादळी वारे सुटून विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला.
दरम्यान, वीजप्रवाह खंडित झाल्याने , नागरिक विजांच्या आवाजामुळे भयभीत झाले होते.
मुढवी येथील ईश्वर साळुंखे यांची एक म्हैस, एक रेडी, तर महेश गोरे यांची एक म्हैस वीज पडून मृत्युमुखी पावली.
कात्राळ येथील दिगंबर सांगोलकर यांच्या घरावरील पत्रे वादळाने उडाले. निंबोणी येथील बिरा येडवे यांच्या कडब्याच्या गंजीवर वीज कोसळल्याने कडब्याची गंज पेटून भस्मसात झाली.
तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या आदेशाने तलाठ्यांनी पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज