टीम मंगळवेढा टाईम्स।
ज्वारीच्या दळणाची २०० रुपये उधारी मागितल्याने तिघांनी एकास लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण, जातिवाचक शिवीगाळ केली. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास खुपसंगी येथे ही घडली आहे.
याप्रकरणी चंदू ताड, त्याची पत्नी व मुलगा (रा.पाठखळ) यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी कुमार बंडू ढावरे (वय २४, रा. खुपसंगी) यांनी फिर्याद दिली.
चंदू ताड हा दळणासाठी ज्वारी घेऊन आला होता. त्याच्याकडे पूर्वीची २०० रुपये उधारी होती. ती मागितल्याने त्याने शिवीगाळ केली.
तसेच ढावरे यांची आई त्याला समजावताना त्यांना त्याने गालावर चापट मारली. नंतर संशयित तिघांनी येऊन फिर्यादीसह आईस मारहाण केली.
ते सोडवायला आईच्या अंगावर पडल्यावर त्यांनाही मारहाण केली. त्या जखमी झाल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज