टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात कोरोना रूग्ण संखेत भर पडत असून ती बारावर पोहचली आहे.
भविष्यात सणासुदीचे दिवस येत असल्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यात दि.७ रोजी ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामध्ये मंगळेढा शहर ५, गोणेवाडी २, दामाजी नगर १, आंधळगांव १, तर दि.८ रोजी ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामध्ये आसबेवाडी २, अकोला, फटेवाडी १, आशि रूग्ण संख्या संख्या आहे.
आतापर्यंत १२८ जणांचा जीव गेला आहे काल आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.भविष्यामध्ये गणपती उत्सव , गौरी उत्सव येत असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे , ठराविक अंतर ठेऊन खरेदी करावी.
बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी आसे आहवान आरोग्य विभागाने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज