मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक भागात ट्युशन घेतल्या जातात. मात्र, शिक्षक नोकरीत असताना, बाहेर खासगी शिकवणी वर्ग घेणे आता त्यांना परवडणारे नाही.
अनुदानित शिक्षक जर खासगी ट्युशन घेत असतील तर त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे खासगी ट्युशन घ्याल तर थेट नोकरीलाच मुकाल.
कायमस्वरुपी नोकरी असलेल्या शिक्षकाने कुठलीही खासगी शिकविणी वर्ग घेऊ नये. असा शिक्षण विभागाचा व शासनाचा नियम आहे.
ज्या संस्थेत शिक्षक कार्यरत आहेत. संस्थेकडूनच शिक्षकांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येते. शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवा आणि त्यांना खासगी ट्युशनची गरज भासणार नाही. जर शिक्षकांना शासनाकडून पगार मिळत असाल, तर खासगी ट्युशन घेणे टाळावे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास, त्यांना शाळेत मार्गदर्शन करावे.
कारवाईचे स्वरूप
खासगी ट्युशन घेणार्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई शाळेतील नियमांनुसार होऊ शकते. निलंबन हे काही कालावधीसाठी केले जाऊ शकते. या प्रकरणांमध्ये तुमची नोकरीदेखील जाऊ शकते.
अनुदानित शिक्षकांना खासगी ट्युशन घेता येत नाही. असे प्रकार घडत असतील, तर संस्थेतील मुख्याध्यापक, चेअरमन, सचिव अशा संबंधित शिक्षकांवर पुराव्यानुसार कारवाई होऊ शकते.(स्रोत:पुढारी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज