टीम मंगळवेढा टाईम्स ।
लॉकडाऊनची संधी साधून साध्या गणवेशातील पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्याने येणारे-जाणारे दुचाकी, चारचाकी वाहने अडवून कागदपत्रे लायसन्स मागणी करत होते. ते नसल्यास पावती फाडण्याची भीती दाखवून पैसे गोळा करत होता.
पोलिसांनी त्या तोतया पोलिसाला ४०० रुपयांसह रोहाथ पकडले. ही घटना सांगोला ते मंगळवेढा जाणाऱ्या रोडवरील वाढेगाव मुख्य चौकात उघडकीस आली.
संतोष करत रावसाहेब काटकर (रा.भोसे,ता.मंगळवेढा) असे त्याचे नाव आहे.दि.९ मे रोजी दु. ३ च्या सुमारास पोलीस नाईक धनंजय अवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे सांगोला पोलीस स्टेशनला असताना वाढेगाव येथील शहाजी माने याने पोलीस नाईक धनंजय अवताडे यांच्या मोबाईलवर फोन केला.
सांगोला ते मंगळवेढा जाणाऱ्या रोडवर वाढेगाव येथील मुख्य चौकात साध्या गणवेशातील एक व्यक्ती मी पोलीस आहे असे सांगून एमएच-१३ एक्यू ९१५२ ही त्याची दुचाकी रस्त्याच्या शेजारी लावली.
रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहन अडवून लायसन्स कागदपत्रांची मागणी करत असे. ते नसल्यास पावती फाडण्याची भीती दाखवून पैसे गोळा करत असल्याचे माहिती दिली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ वाढेगाव येथील मुख्य चौकात जाऊन त्यास रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १०० रुपयांच्या ४ नोटा मिळून आल्या.
याबाबत पोलीस नाईक धनंजय अवताडे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संतोष रावसाहेब काटकर (वय ३५, रा. भोसे, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज