टीम मंगळवेढा टाइम्स।
दैनिक दामाजी एक्सप्रेसचा १४ वा आणि शहरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शुक्रवार दि.१ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण बॉलीवूड गायक शब्बीरकुमार व महाभारत- अर्जुन फेम अभिनेते फिरोज खान यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
दैनिक दामाजी एक्सप्रेसच्यावतीने स्व.जयलक्ष्मी यल्लटीकर यांना गायनरत्न (मरणोत्तर), श्रीरंग गुंगे यांना जीवनगौरव, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना शिक्षणरत्न, या राजेंद्र हजारे यांना समाजरत्न, डॉ. अरूण कोळेकर यांना साहित्यरत्न, बापू ल वाकडे यांना सेवारत्न, हणमंत मासाळ यांना कृषीरत्न, प्रा. सचिन इंगळे यांना आदर्श पत्रकार,
स्व.यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान मंगळवेढा यांना आदर्श सामाजिक संस्था, जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ, मंगळवेढा यांना उपक्रमशील मंडळ आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तर शहरच्यावतीने विष्णू चौगुले यांना जीवनगौरव, गजानन पवार यांना सेवारत्न, सुरेश भाकरे यांना सहकाररत्न, सिध्देश्वर पाटील यांना कृषीरत्न, सुनिल नागणे यांना क्रीडारत्न, प्रा. दिनेश मेटकरी यांना उपक्रमशील शिक्षक, दत्तात्रय नवत्रे यांना आदर्श पत्रकार,
विकास माने यांना आदर्श सहकार सेवक, पेंटर सुभाष भंडारे यांना अक्षररत्न, महादेवी शिंदे यांना उत्कृष्ठ छायाचित्रकार हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
आप्पाश्री मंगल कार्यालय, सांगोला रोड, मंगळवेढा येथे आज दुपारी ३ ते ५ स्वागत समारंभ, स्नेह मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी ५.०० वा. पुरस्कार वितरण सोहळा होणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दामाजी एक्सप्रेस परिवार, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहरच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज