टीम मंगळवेढा टाईम्स।
देशासह जगभरात आज ‘ईद-उल-फित्र’ म्हणजेच ‘रमजान ईद’ साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे.
ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात.
या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे.
सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत.
कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे.
महिनाभराच्या रमजाननंतर अखेर सोमवारी ईदचा चंद्र दिसला. चंद्र दिसताच लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि अभिनंदन केलं.
ईदचा चंद्र दिसल्याने सोमवारी शेवटची नमाज-ए-तरावीहची झाली. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदींमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली.
मौलाना आणि मौलवी यांनी ईदचा सण शांततेत आणि प्रेमानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
ईद हा सण शव्वालचा चंद्र पाहून साजरा केला जातो. शव्वाल हे अरबी कॅलेंडरमधील एका महिन्याचे नाव आहे. हा महिना रमजान महिन्यानंतर येतो.
शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी शेवया किंवा खीरसह अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. ‘हा सण आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो.
त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो’, असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज