टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या युक्रेन आणि रशियात युद्धाचा भडका उडाल्याने भारतातील अनेक विद्यार्थी हे युक्रेन मध्ये अडकून पडल्याने आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याची मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे.
युक्रेन (Ukraine) येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो मुले भारतातून आणि महाराष्ट्रातून युक्रेन मध्ये गेली आहेत. मात्र युक्रेन रशिया युद्ध सुरु झाल्याने अनेक मुले तेथेच अडकून पडली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (mangalwedha) येथील ६ तर पंढरपुरातील एक विद्यार्थी सध्या युक्रेन मध्ये अडकले आहेत. काल त्यांच्या विमानाची तिकिटे काढल्यावर विमातळावर येत असताना तेथे हल्ला झाल्याने विमानसेवा बंद झाली आणि हि मुले पुन्हा त्यांच्या युनिव्हर्सिटी कडे परत गेली.
पंढरपूर येथील प्रसाद भाऊसाहेब शिंदे हा विद्यार्थी सध्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून काल त्याचे परतीचे विमान रद्द झाल्याने त्याला पुन्हा युनिव्हर्सिटी कडे परतावे लागले होते.
मंगळवेढा येथील प्रथमेश कांबळे, अभिजित चव्हाण, प्रथमेश माने, प्राजक्ता भोसले, रितेश गवळी आणि सुप्रिया सुभाष खटकाळे हे विद्यार्थी देखील युक्रेन मध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीकडे पालक डोळे लावून बसले आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी आज मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान हे पालक सध्या घरात टीव्हीवर युद्धाच्या बातम्या पाहून धास्तावले आहेत. समाधानाची बाब म्हणजे या पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा फोनवरून संपर्क होत असून मुलांनी आपण सुखरूप असून तातडीने आम्हाला येथून परत आणण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी पालकांकडे केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज