mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार आवताडे यांनी बोलवली अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक; तर दुसरीकडे आज २४ गावांच्या भव्य पाणी परिषदेचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 4, 2024
in मंगळवेढा
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी २४ गावांची भव्य पाणी परिषद निंबोणी येथे आज मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती २४ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यात दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक आज बैठक बोलावली आहे.

२४ गावांच्या पाणी संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी पाटकळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.  त्यामध्ये शासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी अन्यथा  २४ गावांनी पुढील सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकणे व कर्नाटकला गावे जोडा असा इशारा दिलेला होता. यामुळे संपूर्ण राज्यात  खळबळ उडाली होती.

सदर २४ गावातील लोकांना शासन आपल्या २४ गावांची दखल घेऊन पाणी प्रश्न मार्गी लागेल, अर्थसंकल्पात तरतूद होऊन योजनेला मंजुरी मिळेल असे वाटले होते.

परंतु अद्यापही राज्य मंत्रीमंडळांने मंजुरी न दिल्यामुळे २४ गावातील सर्व शेतकरी महिला पदाधिकारी यांची भव्य पाणी परिषद निंबोणी येथे आज मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मारुतीचे पटांगण, निंबोणी  ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले आहे.

सध्या सकाळी 24 गाव मध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती असून जनावरांना चारा पाणी विकतचा घेतला जात आहे. फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना टॅंकरने पाणी घालून भागात जगवायला लागत आहे.

अनेकांना फळबागांना पाणी न मिळाल्यामुळे पाण्याअभावी बागा जळून जात आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नावरून येथील नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. शासनाने यांच्या भावनांचा विचार लोकसभा आचारसंहितेपूर्वी करणे गरजेचे असल्याचे अनेक ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. नेता इस 24 कावे टोकाचा निर्णय घेऊ शकतात असेही बोलले जात आहे.

24 गावातील विविध गावातून मोटरसायकलच्या रॅली द्वारे शेतकरी निंबोणी गावांमध्ये पाणी परिषदेला पोचणार आहेत असल्याची माहिती कळत आहे.  तरी २४ गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पाणी परिषद यशस्वी करावी असे पाणी संघर्ष समितीच्या वतीने अहवान  करण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील टंचाई संदर्भात आज आमदार आवताडे यांची आढावा बैठक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गतवर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज मंगळवार  सकाळी १०.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे टंचाईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी

आढावा बैठक बोलावली असून मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी सर्कल, कृषी सहाय्यक,  पाणीपुरवठा विभाग,  पशुसंवर्धन विभाग तसेच वीज वितरण यांच्यासह सर्व गावचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

गतवर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. कमी पावसामुळे सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत तसेच बोअर बंद असल्याने नागरिकांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहे.

तसेच जनावरांना चारा टंचाई जाणवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आमदार आवताडे यांनी सदर आढावा बैठकीचे नियोजन करून वरील दुष्काळजन्य समस्यांवरती उपाय योजना विचार विनिमय व आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.

तरी मतदार संघातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी तसेच संबंधित विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दुष्काळ निवारण

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगे पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..