टीम मंगळवेढा टाईम्स।
डिजेवर फुल स्टॉप द्यायचे वेळ आली असून जे मंडळ डीजे वाजवतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी सांगितले.
आज मंगळवेढ्यात जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आगामी गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव अनुषंगाने शांतता मीटिंग आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे आदीजन उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सरदेशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा व सांगोला येथील नागरिकांमध्ये मोठा भाईचारा आहेत. त्यामुळे सर्व सण आनंदात साजरे होणार आहेत. काही तासांच्या आनंदापेक्षा लहान मुले, वृध्द नागरीक यांची काळजी महत्वाची आहे. मिरवणूक दिवशी संपूर्ण दारूबंदी असणार आहे. जे मंडळ सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करतील त्यांचा सन्मान करण्यात येणार.
आदर्श गणेशोत्सव मंडळ पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने आदेश काढला असून यामध्ये गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम, पर्यावरण पूरक, गरजूंना मदत असे काम करणारे मंडळ सहभागी होऊ शकतात.
मंगळवेढा बायपास येथे अवजड वाहतूक रोखण्यासाठी कमान बसवण्यासाठी मी जिल्हा स्थरावरून प्रयत्न केले असून सर्व वाहतूक बाहेरील रोडने जाणार आहे. येत्या काही दिवसात कमान बसेल असे त्यांनी सांगितले.
एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील गावांनी एक गाव एक गणपती स्थापन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा आशा गावांचा आम्ही सत्कार करणार असल्याचे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.
पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रम राबविला जाणार
शाळेतील मुले भरकटत चालले असून प्रत्येक शाळेत पोलीस जाऊन त्यांची मदत करणार आहेत. मुलांच्या पालकांना देखील पोलीस मदत करणार आहेत. मुलींच्या शाळेत महिला पोलीस जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून मदत करणार आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव बोलताना म्हणाले की, प्रत्येक मंडळाने रीतसर परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी, अन्य प्रकारची मदत ही करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत, ऑनलाइन परवाना घरपोच देण्यात येणार आहे.
गणेश मूर्ती बसवताना नेता आणता येईल आशा पध्दतीने बसवा, पावसाचे पाणी मंडपात येणार नाही याची दक्षता घेऊन सर्व सोयी सुविधा उपलब्ध करूनच मंडळ स्थापन करावे, देखावे उभारताना पर्यावरण पूरक देखावे सामाजिक देखावे दाखवा, ईदच्या मिरवणुकीसाठी मंगळवेढेकरांनी जो समजतो दाखवला तो कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युवराज घुले, माऊली कोंडूभैरी, मुझमिल काझी, फिरोज मुलाणी, समाधान हेंबाडे, शुभांगी सुर्यवंशी, नारायण गोवे, देवदत्त पवार, अशोक शिवशरण, अँड.राहुल घुले, अँड.रमेश जोशी, नगरपालिका कर्मचारी सचिन मिसाळ, औदुंबर वाडदेकर, आदींनी अडीअडचणी सांगितल्या.
या बैठकीला मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, नगरपालिका कर्मचारी, राजकीय पदाधिकारी आदीजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक रणजित माने, प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी सादर केले तर आभार पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज