टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजपर्यंत महाराष्ट्राने स्व.बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांची “ठाकरी” शैली आणि धरणात मुतण्यापासून ते लोडशेडिंगमुळे लोकसंख्या वाढतेय अशी कमरेखालची भाषा वापरणारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पवार “शैली” अनुभवली आहे.
फक्त अनुभवली नाही तर ती संपूर्ण राज्याने मान्य देखील केली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्राने रांगडा व गावगाड्यातला असणारा आमचा बहुजन नेता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या खास “शैली” ची सवय लावून घ्यावी असे मत बहुजन गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. बापूसाहेब मेटकरी यांनी व्यक्त केले आहे.
अॅड.बापूसाहेब मेटकरी यावेळी बोलताना म्हणाले, गाव वाड्यातला रांगडा माणूस असल्यामुळे आमदार पडळकर हे बोलताना गावातील म्हणींचा वापर करून अत्यंत पोटतिडकीने नेहमीच बोलतात.
त्यामुळे त्यांच्या या शैलीकडे यापुढे महाराष्ट्राने पडळकर “शैली” म्हणून पहावे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभरात घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सर्व बहुजनांमध्ये जनजागृती करत आहेत.
घोंगडी बैठकांच्या माध्यमातून आमदार पडळकर यांना मिळणारा बहुजनांचा प्रतिसाद पाहून प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सोलापूर मध्ये झालेला हल्ल्या त्यातलाच प्रकार आहे. स्वतःला पुरोगामित्वाचे वारसदार म्हणवुन घेणारे बहुजनांना न्याय मिळवून देण्यात मात्र पुरते अपयशी ठरले आहेत.
किंबहुना गोरगरिबांच्या पोरांना जर न्याय मिळाला आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो या गोष्टींची सर्व प्रस्थापितांना जाण असल्यामुळे ते गोरगरिबांना न्याय देत नाहीत. पण बहुजन समाजाचा एक युवक संपूर्ण राज्यात जनजागृती करतोय आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच आमदार पडळकर यांचेवर सध्या राज्यभरात टीका होत आहे.
पण कोंबडं किती जरी झाकलं तरी पहाट होणारच आहे. त्यामुळे येणारा काळ हा गोपीचंद पडळकर यांचा असणार आहे याची सर्व प्रस्थापितांनी जाण ठेवावी. आणि यापुढे जर आमदार पडळकर यांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो कार्यकर्ता ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नसल्याचेही या वेळी बोलताना अॅड. मेटकरी म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज