टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे पावसाची महत्वाची अनेक नक्षत्रे कोरडी गेली असताना मंगळवेढ्यात काल दुपारी ३ वाजता अचानक ढग येवून विजांचा कडकडाट होत मुंढेवाडी पाटी ते बोराळे दरम्यान ढगफुटी होवून काळ्या शिवारात तळे साचल्याप्रमाणे पाणी साचून राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दि.८ जून रोजी पावसाचे मृग नक्षत्र निघाले मात्र नक्षत्र कोरडे गेल्यामुळे याचा परिणाम खरीप पेरणीवर झाल्याने पेरण्या वेळेत होवू शकल्या नाहीत.
दि. १५ जुलैच्या पुढील नक्षत्रात हलका पाऊस पडल्याने महागडी बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांनी शेतात काही तरी पिकेल या आशेवर पेरणी केली.
पिकांची उगवण झाली मात्र त्याच्या पोषक वाढीसाठी पुढे पाऊस न पडल्यामुळे पिकांनी माना टाकल्या व आजतागायत कुठल्याच नक्षत्रात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली.
बळीराजा दररोज उगवणाऱ्या दिवसाकडे आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल अशा नजरा लावून दिवस काढत असताना दैनंदिन ढग व वारा यांचा पाठशिवनीचा निसर्गाचा खेळ सुरु आहे.
शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी सकाळी सुर्यो दयानंतर कडक ऊन पडत गेले व दुपारी ३ वाजता आकाशात काळे ढग येवून झाल्याने अचानक पावसाळी स्थिती निर्माण झाली. या दरम्यान आकाशात स्फोट व्हावा अशा प्रकारचा मोठाला आवाज निर्माण झाला.
या आवाजाने मंगळवेढा शहर परिसर हादरुन गेला. या दरम्यान मुंढेवाडी पाटी ते बोराळे या काळ्या शिवारात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होवून मोठा पाऊस पडल्याने काळा शिवा जलमय झाला असून या परिसरात सर्वत्र पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळत आहे.
अनेक दिवसातून पाऊस पडल्याने या मार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या ढगफुटी पावसाचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडीयावर टाकल्याने सर्वत्र या पावसाची चर्चा रंगली आहे.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज