टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन हत्यांचे प्रकार घडले. यात एका १६ महिन्यांच्या मुलाचा जन्मदात्या आईनेच विहिरीत टाकून खून केल्याचे उजेडात आले. तर दुसऱ्या घटनेत खून करून मृतदेह पोत्यामध्ये बांधून नदीच्या पात्रात टाकून देण्याचा प्रकार घडला. तसेच एका मागासवर्गीय तरुणाचाही क्षुल्लक कारणावरून तिघा बापलेकांनी खून केला.
करमाळा तालुक्यातील पोथरे येथे बबन शामराव कडू यांच्या शेतातील विहिरीत १६ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. जन्मदात्या आईनेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
दत्ता सुभाष कडू (वय २८) याने या संदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याची पत्नी रूपाली हिने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. या खुनाचे कारण लगेचच स्पष्ट झाले नाही.
मंगळवेढ्यात दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येड्राव रस्त्यावरील दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . सोमशंकर गोपाळ लाड ( वय २४ ) असे मयत तरुणाचे नाव असून ता . १ ९ सप्टेंबर रोजी तो दुचाकीवरुन जात असताना दुचाकी स्लीप होऊन पडल्याने त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला जोरात मार लागला होता.
त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्या अपघाताची फिर्याद आज दाखल करण्यात आली.
पोत्यात बांधून टाकलेला मृतदेह सापडला
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील बोरीनदीच्या पात्रात पोत्यात बांधून टाकलेला मृतदेह सापडला. हा खुनाचा प्रकार असून मल्लप्पा नागप्पा सुनगार (वय ३५, रा. हिरोली, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तो भजन ऐकण्यासाठी म्हणून गावातून नजीकच्या भीमपूर येथे गेला होता. तो पुन्हा घरी आला नव्हता. या गुन्ह्यचा तपास अक्कलकोट उत्तर पोलीस करीत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पत्ते खेळताना झालेल्या वादातून नागनाथ सुरेश साबळे (वय २८) या मागासवर्गीय तरुणाचा तिघा बापलेकांनी खून केला.
गुरुनाथ भीमा पवार (वय ६०) व त्याची मुले प्रवीण (वय ३१) आणि सुनील (वय ३३) यांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी मृत नागनाथ यास जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्कय़ांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा जीव गेला.
कर्नाटकातील हिरोळी येथील 35 वर्षीय युवकाच्या खुनाचा शोध अवघ्या 24 तासात पोलिसांनी लावला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशयात एक मृतदेह सापडला होता. पाण्यातून मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. त्याच्या शर्टवरून पोलिसांनी शोध लावून त्याचा पत्ता शोधून काढला.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे सैपन ऊर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय 22), अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22), वाघेश इरण्णा हणमशेट्टी (वय 30 सर्व रा.हिरोळीं तालुका आळंद, जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक), संजयकुमार हिरू राठोड (वय 27 रा.गांधीनगर तांडा, दुधनी ता.अक्कलकोट) अशी आहेत.संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती काढली.
तसेच सायबर सेलच्या माध्यमातून तपास करून पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत चार संशयितांना अटक केली. प्रथम दुधनी गांधीनगर तांडा येथील एका संशयितास अटक केली व त्याच्याकडून इतर तीन आरोपींची माहिती मिळाली.
कर्नाटक राज्यातील हिरोळी या गावातून उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून अक्कलकोटला आणले.
आळंद तालुक्यातील हिरोळी येथील युवक मल्लप्पा नागप्पा सुनगार (वय 35) याचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशयात टाकण्यात आलेला होता. पाण्यातून मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. त्याच्या शर्टवरून पोलिसांनी शोध लावून त्याचा पत्ता शोधून काढला.
यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, हेडकॉन्स्टेबल अंगद गीते, युसुफ शेख,महेश कुंभार, प्रवीण वाळके, बिपिन सुरवसे, बशीर शेख यांनी प्रयत्न केले.
या खुनाची फिर्याद मयताचा मोठा भाऊ शहाणप्पा नागप्पा सूनगार रा. हिरोली ता.आळंद यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती. हा खून कसा व कुठे केला, वाहने कोणती वापरली याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंगद गीते, पोलिस हेडकॉन्स्टेबल यमाजी चव्हाण, पोलिस नाईक प्रवीण वाळके, पोलिस नाईक धनु राठोड, हवालदार मनोज भंडारी व सायबर सेलचे कॉन्स्टेबल रवी हातकिले यांनी पार पाडली.
Three murders in Solapur in last 24 hours; Murder of 16-month-old boy by mother
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज