टीम मंगळवेढा टाईम्स।
फायनान्समध्ये कामास आहे, पैसे द्या, सोने सोडवून आणतो, अशी बतावणी करत २ लाख ९० हजार घेत पळून गेलेल्या घाटनेची नोंद सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसात झाली आहे. यासंदर्भात उदय शरद कुलथे, रा.भवानी पेठ यांनी तक्रार दिली आहे.
यातील उदय कुलथे यांचे सराफ कट्टा, मधला मारुती येथे अभय कुलथे नावाचे सोन्याचे दुकान आहे. मुथुट फायनान्स, येथील मॅनेजर गुरुदत्त वाघमारे यांच्याशी त्यांची ओळख आहे.
मॅनेजर वाघमारे यांनी जर कोणी ग्राहक सोने इतरत्र गहाण ठेवण्यासाठी आले किंवा त्यांनी इतरत्र सोनारांकडे सोने गहाण ठेवले असेल तर त्यांना फायनान्समध्ये कमी व्याजदराने कर्ज देऊ त्यासाठी तुम्ही मदत करा, असे सांगितले होते
व त्यांना फायनान्समधून रक्कम मिळेपर्यंत रकमेची व्यवस्था करीत जावा, त्या पोटी 5 कुलथेंना ग्राहकांकडून १ टक्का कमिशन मिळत असे.
एक डिसेंबरला दुपारी दीडला मुथुट फायनान्सचे मॅनेजर गुरुदत्त वाघमारे यांनी फोन करुन सांगितले की, एका ग्राहकाचे सोने रेवणकर सराफांकडे तारण ठेवले असून ते सोडविण्यासाठी २ लाख ९० हजार रुपये लागणार आहेत.
त्याची तरतुद करून ग्राहकास द्या व ग्राहकास तुमचा मोबाईल नंबर दिला व ते तुम्हाला कॉल करतील असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात ७०५८३३२१९२ या नंबरवरून कुलथेंना कॉल आला व त्यांनी मी हर्षल बोलतो आहे. मला फायनान्स येथील साहेबांनी तुमचा नंबर दिला आहे. ही रक्कम रोख स्वरुपात द्या.
मी फायनान्स ऑफिसच्या खाली थांबलेलो आहे असे कळविले. त्यावरून कुलथे व सोबत सौरभ जोजारे हे दोघे मुथुट फायनान्स ऑफिसच्याखाली गेले. तेथे त्यांना हर्षल भेटला आहे, माझेच सोने सोडविण्यासाठी फोन केला होता.
सदरची रक्कम माझ्याकडे द्या असे म्हणाल्याने कुलथेने ती रक्कम त्यास दिली. तुम्ही तुमची गाडी घ्या आपण सराफाकडे जाऊ, असे म्हणाल्याने कुलथे आपली बाजुला लावलेली गाडी वळवून घेईपर्यंत तो व्यक्ती तेथून निघून गेला.
नंतर मोबाईल बंद
आरोपीचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद लागत होता. त्याचे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही. कुलथे यांनी ही तक्रार दिली आहे. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज