टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा सबजेल कारागृहात ५१ कैद्यापैकी ३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान ग्रामीण रूग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक विजयकुमार येळदरे यांनी जेलर , कैदी , पोलिस कर्मचारी यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
मंगळवेढा कारागृहातील दोन कैदी आजारी असल्याने त्यांना त्रास होत असल्याचे तक्रारीवरून परवा सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात तपासणीला नेण्यात आले.
यावेळी दोन पैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तपासणीत आढळून आले.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर मंगळवेढा कारागृहातील उर्वरीत ५१ कैद्यांची तपासणी केल्यानंतर दोन कैदी पॉझिटिव्ह आल्याने येथील पॉझिटिव्ह कैद्याची संख्या आता तीन झाली असल्याचे जेलरकडून सांगण्यात आले.
येथील दोन कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कैदी पॉझिटिव्ह आल्याने तेथे गार्डवर काम करणारे पोलिस कर्मचारी व कैदी भयभीत झाले होते.
ग्रामीण रूग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक विजयकुमार येळदरे यांयासह पथक कारागृहात शनिवारी दुपारी १२ वाजता तपासणीसाठी दाखल झाले.
यावेळी जेलर सिताराम कोळी तसेच कैद्यांना अन्नपुरवठा करणारे ठेकेदार , गार्डवर असलेले पोलिस कर्मचारी यांचीही तपासणी करण्यात आली.
मात्र यांचा रिपोर्ट निगेटिव आला आहे. मागील वर्षी कारागृहात मोठया संख्येने कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नवीन तहसिल कार्यालयातील कारागृहात विलगीकरण करण्यात आले होते.
सध्या केवळ तीनच कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथेच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज