टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-उचेठाण मार्गावर बेकायदा वाळू वाहतुक करणारे चारचाकी वाहन पोलिसांनी पकडून वाळू व वाहनासह 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वैभव प्रभाकर चव्हाण (रा.ब्रम्हपुरी) याला पोलिसांनी अटक केली व न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी पोलिस शिपाई सोमनाथ माने,पोलिस हवालदार दयानंद हेंबाडे,पोलिस नाईक मोरे,पोलिस शिपाई काळेल असे दि.13 रोजी रात्री 1.30 वा.
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त बोराळे बीटमध्ये घालत असताना मंगळवेढा ते उचेठाण मार्गावर
एम एच 13 के,6539 हे वाहन पाऊण ब्रास 3500 रुपये किमतीची बेकायदा वाळू घेवून जात असताना मिळून आले.
पोलिसांनी वाळू व वाहनासह 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन आवारात आणून वाहन लावले आहे.दरम्यान, वाहनामध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळून आली नाहीत.
पोलिसांनी चेक करण्यासाठी वाहनास इशारा करून वाहन थांबविले,मात्र आरोपी तथा चालक वैभव चव्हाण हा अंधाराचा फायदा घेवून सुसाट जागेवर वाहन सोडून पळत असताना पोलिसांनी त्यास गराडा घालून पकडले.
आरोपीस तपासिक अंमलदार पोलीस हवालदार नवले यांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज