mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संकल्प! ठेवीदारांना कोट्यावधींचा बुक्का लावणारा प्रथमेश कट्टे अखेर जेरबंद; पतसंस्थेत 3 कोटी ९३ लाखांचा अपहार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 12, 2023
in क्राईम, सोलापूर
बार्शी नंतर पंढरपूर व मंगळवेढेकरांची उडाली झोप! सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचा बहाणा; प्रथमेश कट्टेसह दोघांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

गेली दोन वर्षांपासून गाजत असलेल्या, पंढरपूर येथील बहुचर्चित संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ९३ लाख ७७ हजार रूपयांचा अपहार झाल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचा मुख्य प्रवर्तक तथा चेअरमन प्रथमेश सुरेश कट्टे (रा. पंढरपूर), संचालक सचिव, तथा व्यवस्थापक अविनाश दत्तात्रय ठोंबरे (रा.करकंब ) या दोघांना पुणे येथे पकडून अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली.

सन २०१९ मध्ये फार मोठा गाजावाजा करत येथे संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरूवातीला ठेवी मिळविण्यासाठी मोठमोठ्या बक्षिसांच्या योजना जाहीर करण्यात आल्या.  त्यामुळे अगदी कांही दिवसांत संस्थेकडे कोट्यवधींच्या ठेवी जमा झाल्या.

मात्र, मुदत संपल्यानंतर ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याचे समोर आल्याने शेकडो ठेवीदार हादरून गेले. त्यातूनच अनेकांनी पोलीस तसेच संबंधित प्रशासनाकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार यापूर्वीही गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशान्वये विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ (सहकारी संस्था) बप्पाजी पवार (रा.सोलापूर) यांनी संस्थेची तपासणी केली.  त्यामध्ये अनेक गंभीर प्रकार समोर आले असून त्याबाबतची फिर्याद त्यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे.

दाखल फिर्यादीनुसार, प्रथमेश कट्टे व अविनाश ठोंबरे या दोघांनी संगनमताने सभासदांच्या वसूल भागभांडवलातील ३० लाख रूपयांचा अपहार केला. तसेच मुदत संपलेल्या एकूण ३ कोटी ६३ लाख ७७ हजार इतक्या ठेवींच्या रक्कमेचा विनियोग संस्थेच्या सभासदांना कर्ज देण्यासाठी अथवा रोखता व तरलतेसाठी गुंतवणूक न करता कट्टे व ठोंबरे या दोघांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या रक्कमेचा अपहार केला.

मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचे चौकशीत निदर्शनास आले. यात १२ ठेवीदारांनी त्यांची ३९ लाख ९४ हजार रूपये इतकी ठेवीची रक्कम मुदत संपूनही मिळत नसल्याची तक्रार दाखल करून तसा जबाब नोंदविला होता.

येथील लेखापरिक्षक कार्यालयात याबाबतची कागदपत्रे जमा करण्यात आली होती. चौकशी प्रक्रियेदरम्यान सचिव तथा व्यवस्थापक अविनाश ठोंबरे याने दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी आर्थिक गुन्हे  शाखेचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे ३४ ठेवीदारांची यादी सादर केली होती. त्यानुसार एकूण २ कोटी ३६ लाख ५० हजार इतक्या रक्कमेच्या ठेवीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी ३४ व ४९ ठेवीदारांच्या याद्या ठोंबरे याने सादर केल्या. त्यामध्ये अनुक्रमे ३६ लाख ७३ हजार व ५० लाख ६० हजार अशा ८७ लाख ३३ हजारांचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार १३२ ठेव पावत्यांद्वारे ठेवीदारांनी ठेवलेल्या ३ कोटी ६३ लाख ७७ हजार रूपये इतक्या रक्कमेचा अपहार करण्यात आला.

अशा प्रकारे एकूण ३ कोटी ९३ लाख रूपयांचा अपहार करून फसवणूक करण्यात आले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कागदपत्रांचे बनावटीकरण, अपहार, गैरव्यवहार, फसवणूक अशा प्रकारचा ठपका ठेवत विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार संजय मुळे हे करीत आहेत.

तीन गंभीर गुन्ह्यातील तिघे एकाचवेळी जाळ्यात

संकल्प पतसंस्थेतील अपहार प्रकरणी यापूर्वीही एक गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये मुख्य प्रवर्तक प्रथमेश कट्टे पोलिसांना हवा होता. तसेच नवीन गुन्ह्याची कुणकुण लागल्याने अविनाश ठोंबरे हा पसार झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे बाणेर) येथील हायप्रोफाईल सोसायटीतील एका अलिशान बंगल्यात शुक्रवारी सकाळी अचानक छापा टाकण्यात आला.

त्यामध्ये कट्टे व ठोंबरे या दोघांसह येथील भूखंड घोटाळ्यातील दादा पवार हाही जागेवर सापडला. कोट्यवधींच्या घोटाळ्यातील हे तिघेही नांव-गांव बदलून अतिशय चैनीत राहताना सापडल्याचे सहा. पोलीस निरीक्षक भागवत यांनी सांगितले.

नोंदणी प्रमाणपत्र मिळवितानाही फसवणूक

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर शाखेत पतसंस्थेचे चालू खाते असून त्यामध्ये दि. १ जानेवारी २०१९ रोजी ५० लाख, तर ८ जानेवारी २०१९ रोजी ५३ लाख १० हजार रूपये असल्याचा बनावट बँक खाते बाकी दाखला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांच्या कार्यालयास सादर करण्यात आला. या दाखल्याच्या आधारे फसवणूक करून मुख्य प्रवर्तक प्रथमेश कट्टे याने दि. ८ जानेवारी २०१९ रोजी पतसंस्थेच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रथमेश कट्टे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
Next Post
मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी म्हणून बी.आर.माळी यांनी स्विकारला कार्यभार; कर्मचाऱ्यांची घेतली तात्काळ बैठक दिल्या ‘या’ सक्त सूचना

मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी म्हणून बी.आर.माळी यांनी स्विकारला कार्यभार; कर्मचाऱ्यांची घेतली तात्काळ बैठक दिल्या 'या' सक्त सूचना

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा