मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
9 वर्षे व 11 वर्षे वयाच्या 3 बालकांना लुळेपणा, अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू असून, तिन्ही मुले नातेसंबंधात आहेत.
आरोग्य यंत्रणेने गावात सर्वेक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे खंबाटवस्ती पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. यात या 3 मुलांव्यतिरिक्त इतर रुग्ण आढळून आलेले नाहीत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम 9 वर्षीय मुलाला 12 जुलैला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला. आधी गावात उपचार घेण्यात आले.
मात्र, तरीदेखील मुलांची प्रकृती खालावत असल्यामुळे मुलाला छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 16 जुलै रोजी 11 वर्षीय मुलालाही अचानक अशक्तपणा आल्याने त्यालाही उपचारासाठी दाखल केले.
तर, 30 महिन्यांच्या बालकाला 17 जुलैला असाच त्रास सुरू झाला, त्यानंतर त्यालाही उपचारासाठी भरती करण्यात आलं. दोन मुलांवर ‘पीआयसीयू’त आणि 30 महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाटवस्ती, पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं आहे. या त्रास होत असलेल्या मुलांना सारखीच लक्षणे असल्यामुळे तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, हे सर्वजण एकमेकांच्या नात्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पाण्याचा वापर थांबविला
गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ आहे. ते पाणी तूर्त पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या.
आरोग्य विभागाने केली ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ म्हणून नोंद
या मुलांची आरोग्य विभागाने ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ (एएफपी) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज