टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर गावचे ग्रामसेवक मधुकर पवार यांना वाळूचा परवाना देण्यासाठी मारापूरच्या शेलार पाटील याने जीवे मारण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मारापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मधूकर गुलाब पवार (रा.भोसे ता.मंगळवेढा यांना मारापूर येथील शेलार नेताजी पाटील (रा.यादव वस्ती) याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर येवून मला घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे , परवाना दे ,
माझे घरकुलाचे बिल काढून दे अन्यथा तुझा खेळ खलास करेन, बघून घेतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत पवार यांच्या हातातील सरकारी कामकाजाची पिशवी हिसकावून घेवून जमिनीवर फेकून दिले.
सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद मधूकर पवार यांनी मंगळवेढा पोलिसात दिली.या प्रकरणी आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३५३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज