टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘बुलेटसह दुचाकींचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज देणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या दुचाकींच्या नंबरचा फोटो पाठवा, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल,’ असे आवाहन मंगळवेढा पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.
कर्णकर्कश आवाजाच्या, फटाके फोडणाऱ्या बुलेटसह काही दुचाकी चालक शहरातील विविध रस्त्यांवर नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने भरधाव जाताना दिसतात. त्यांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर काहीजण
उलट अरेरावी करतात. त्यामुळे अशांची तक्रार देण्यासाठी कुणी समोर येत नाहीत. अशा दुचाकींचा बंदोबस्त करण्यासाठी मंगळवेढा पोलिसांनी नागरिकांनाच आवाहन केले.
अशा गाड्या जर कुणाला दिसून आल्या तर गुपचूप त्यांच्या नंबरचा फोटो काढून तो फोनद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
अशा गाडीचे फोटो पाठवल्यानंतर तिचा शोध घेऊन चालकावर पोलिसी कारवाई करतील, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.
मेकॅनिकवरही कारवाई करणार
दुचाकी चालकाने त्याच्या गाडीचे सायलेन्सर कोण्या मेकॅनिककडून बदलून घेतले, अशा मेकॅनिकविरुद्ध कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार
असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिली. त्यामुळे मेकॅनिकनेही गाड्यांना सायलेन्सर बदलून देऊ नये, असे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज