mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कृष्णा खोर्‍यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांची आज सांगोल्यात पाणी संघर्ष परिषद; पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पाणी कधी मिळणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 26, 2024
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
नागरिकांनो! मंगळवेढयात आज रक्तदान शिबीर व महिलांसाची मोफत हिमोग्लोबिन तपासणी होणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष आ.भाई कै.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून अथकपणे पाण्यासाठी लढा उभा राहिला.

पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं हा चळवळीचा केंद्रवर्ती हेतू ठेवून शेतकर्‍याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली.

या वर्षीची ३२ वी पाणी संघर्ष परिषद आज सांगोला येथे होणार असून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि भाई आ. गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने पाणी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून अविरतपणे लढा दिलेले प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे.

आज बुधवार २६ जून रोजी दु. १ वाजता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्‍यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आणि विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची ३२ वी पाणी संघर्ष परिषद होणार आहे.

शेतकर्‍याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी संघर्षातून हक्काचे पाणी मिळू शकते. भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी. मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी.

उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करण्यासाठी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकर्‍यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणी करावी यासाठी आग्रह धरण्याकरिता.

यासह पाण्यासंदर्भातील अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी ही पाणी संघर्ष परिषद होत आहे. सांगोला येथील मंगळवेढा रोडवरील रामकृष्ण लॉन्स व्हिला येथे ही परिषद होणार असून या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नागनाथ नायकवडी हे आहेत.

दुपारी १ वाजल्यापासून सुरू होणार्‍या ३२ व्या पाणी संघर्ष परिषदेमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, माजी आ.राजेंद्रअण्णा देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर,  अ‍ॅड. सरफराज बागवान, अनिल पाटील, प्रा. दत्ताजीराव जाधव हे प्रमुख वक्ते सहभागी आहेत.

पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना कृष्णा खोर्‍यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठीचा संघर्ष पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी या देशभक्ताने ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेऊन पुकारला.

त्याला आता ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची चळवळ उभी केली.

नागनाथअण्णा व आ. भाई डॉ. गणपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून अत्यंत चिवटपणे जनतेने लढा देऊन सरकारला  कृष्णा खोरे विकास महामंडाळाची स्थापना करायला भाग पाडले.

गेल्या ९ वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावात पाणी आले. पाणी संघर्ष परिषदेचा हा आजवरचा यशस्वी इतिहास आहे. हा एका दीर्घ लढ्याचा इतिहास आहे. अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाणी लढाईसाठी अजूनही शेतकर्‍यांना लढावे लागणार आहे. त्यासाठीच या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात  आले आहे.

तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने ३२ व्या पाणी परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, पाणी संघर्ष चळवळ वैभवकाका नायकवडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रा.शिवाजीराव काळुंगे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 30, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 29, 2026
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

सावधान! शुटिंगच्या नावाखाली गोव्याच्या तरुणाकडून दोन महिलांची फसवणूक; इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..