टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे घरासमोर उभ्या केलेल्या मालट्रकचे 30 हजार रुपये किमतीचे
टायर चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी समाधान जाधव यांचे चार ट्रक असून त्या साखर व सिमेंट वाहतुकीसाठी चालू असतात.
दि.14 रोजी रात्री 10.00 वा. दहा टायर ट्रक क्र.एम एच 10 झेड,4232 ही गाडी धंदा कमी असल्यामुळे मागील दोन महिन्यापासून घरासमोर उभी होती.
सकाळी 8.00 वा. यातील फिर्यादी उठून पाहिले असता सदर ट्रकच्या क्लिनर साईडचे 30 हजार रुपये किमतीचे
एम.आर.एफ कंपनीचे टायर नसल्याचे दिसून आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज