टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील बिरोबा मंदिराच्या गेटजवळ ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटर सायकल लावून जकाप्पा येडके (रा.सोड्डी) हे दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर चोरटयांनी त्यांची मोटर सायकल पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी जकाप्पा येडके हे दि.१२ रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान हुन्नूर येथील बिरोबाच्या दर्शनासाठी मोटर सायकलवर गेले होते.
त्यांनी एम एच १२ डी.एफ १८८६ ही ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल गेटजवळ लावून मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेवून फिर्यादी माघारी आले असता लावलेल्या ठिकाणी मोटर सायकल जागेवर दिसून आली नाही.याची फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला
अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी वाळूचा टेंपो पकडून अज्ञात चालक व मालकाविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांना पाहताच वाहनचालकाने जागेवर वाहन सोडून पलायन केले . या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी पोलिस अंमलदार हरी आदलिंगे हे गस्त घालत असताना दि .१३ रोजी रात्री १.५० च्या दरम्यान टाटा कंपनीचा निळया रंगाचा बिगर नंबरचा टेंपो सोलापूर -मंगळवेढा रोडवर कारखाना चौकाच्या जवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांना मिळून आला.
टेंपो चालक पोलिसांना पाहताच सदरचे वाहन जागीच थांबवून पळून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून पोलिसांनी वाहनाचे चालक व मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सध्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीची धामधूम सुरु असल्यामुळे महसूल व पोलिस प्रशासन निवडणूकीत गुंतल्याची संधी साधून वाळू तस्करवाले भिमा व माण नदीतून रात्रभर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत आहेत.
मंगळवेढा शहरात बांधकामाच्या ठिकाणी सुर्योदयापुर्वी वाळूचे ढिगारे येवून पडत असल्याचे चित्र आहे. या वाळूचोरीमुळे लाखो रुपयांच्या महसूल पाणी पडत असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज