टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे म्हसोबा यात्रेनिमित्त आलेल्या महिला पाहुण्यांची गच्चीवर झोपल्यानंतर पर्समध्ये ठेवलेली
रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे १ लाख ६१ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी पळवून नेला या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी दत्ता मासाळ (रा.गोणेवाडी) यांच्या गावची म्हसोबा यात्रा असल्याने त्यांच्याकडे पाहुणे आले होते.
रात्री ११.४५ वा. सर्वजण जेवण करून नवीन घराच्या बांधकामावरील स्लॅबवर फिर्यादीची पत्नी बानूबाई व मेहुण्याची पत्नी कविता सोलनकर या दोघी झोपण्यास गेल्या.
झोपताना गळयातील दागिने व रोख रक्कम, मोबाईल पर्समध्ये ठेवून ती पर्स दोघीच्यामध्ये ठेवण्यात आली होती. पुन्हा जागे झाल्यानंतर दोघीमधील पर्स गायब झाली.
त्या पर्सचा शोध घेतला असता ती घराच्या पाठीमागे दिसून आली. सदर पर्समध्ये दागिने, पैसे, मोबाईल काहीच मिळून आले नाही.
अज्ञात चोरटयांनी पर्समधील १ लाख ६१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्यादी दिल्यानंतर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज