टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा बसस्थानकात मंगळवेढा – पुणे बसमध्ये चढत असताना मंगळवेढा शहरातील एका डॉक्टरचा हातोहात व्हिवो कंपनीचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरटयांनी अज्ञात पळविल्याची घटना घडली असून याप्रकरणी चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, मंगळवेढयात मोबाईल चोरीचे प्रमाणे वाढले आहे . मोबालईल चोरीप्रकरणी आंध्रातील एका अल्पवयीन मुलीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी डॉ.भिमराव केराप्पा पडवळे हे दि. १८ रोजी सायंकाळी ४.०० वा. मंगळवेढा बसस्थानकावरून सुटणाऱ्या
मंगळवेढा – पुणे बसमध्ये चढत असताना शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात ठेवलेला व्हिवो कंपनीचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरटयांनी हातोहात लंपास केला.
बसमध्ये चढल्यानंतर आपल्या खिशातील मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आल्यावर बसमधून उतरून आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवेढा शहरात भरणाऱ्या सोमवारच्या आठवडा बाजारदिवशी मोबाईल चोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे.
याबाबत फारूक इनामदार यांनीही दि.१९ रोजी तक्रारदाराचा भाऊ नईम हा पाटखळ रस्त्यावरून मंगळवेढा शहरात येत असताना सांगोला नाक्यावर एका अज्ञात इसमाने हिसकावून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.
बाजारातही बाजारकरूंचे मोबाईल पळविण्याचा प्रकार घडत आहे . पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी खबरदारीचा उपाय म्हणून साध्या गणवेशात बसस्थानक , बाजार मैदान येथे पोलिस तैनात करून मोबाईल चोरीला अटकाव घालावा अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज